मी ज्योतिराव फुले बोलतो.....🌹🌹🌹🌹🌹
नमस्कार....
मी ज्योतिराव गोविंदराव फुले.माझा जन्म ११एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे चिमनामाईच्या पोटी झाला.मी शाळेत जायला निघालो.तेव्हा माझ्या हातात शाळेचे पुस्तक नव्हते.वही नव्हती.शाळेचे दप्तर नव्हते.हातात एक कुदळ, फावडे,टोपले हेच माझे दप्तर होते.फुलांचा मळा हीच माझी शाळा.अनेक कटू अनुभवातून माझे बालपण गेले.
माझ्या 'बा' नं जेव्हा मला इंग्रजी शाळेत दाखल करायचं मनात आणलं तेव्हा लोकांचा धर्म आडवा आला.माझी शिकण्याची आवड,जिद्द हेरून गफारबेग आणि लिजीटसाहेब यांच्यामुळे मी शिकू शकलो.माझे आदर्श युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि जार्ज वाशिंग्टन हे आहेत. या दोन्ही युगपुरुषांची चरित्रे वाचली होती.आलेले कटू अनुभव यातून खूप काही शिकलो.मी आणि माझा ब्राम्हण मित्र सदाशिव गावंडे दोघांनी प्रतिज्ञा घेतली होती.आजपासून मी माझे संपूर्ण जीवन माझ्या अज्ञानी देशबांधवांच्या उद्धारासाठीच समर्पित करू.हजारो वर्षांपासून आम्ही अज्ञानात रहावे म्हणून ज्ञान मंदिराचे दरवाजे आमच्यासाठी बंद ठेवले होते.पण आम्ही अंधारात राहणार नाही.हा अंधार आम्ही दूर करू.अनिष्ठ परंपरेचे मूळच मी उखडून काढू.
यातूनच सन १८४८ मध्ये भिडयांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली.यातील पहिले शिक्षक मी.पहिली विद्यार्थिनी सावित्री.सवित्रीनेही माझ्या सोबत अखंड ज्ञान साधना केली.सावित्री पहिली शिक्षिका झाली.रूढी परंपरेच्या बंधनातून मुक्त होऊन मुली या शाळेत शिकू लागल्या.पण समाजातील कर्मठ लोक विरोध करू लागले.मुलींना शाळा शिकवू नये यासाठी काही लोक मुलींना शाळेत तर पाठवत नव्हते .शिवाय ती शाळेत जात असताना लोक तिला शिव्या देऊ लागले.अंगावर शेण टाकू लागले.दगड गोटे मारू लागले.पण तीही कधी डगमगली नाही.माझ्या सोबत खंबीरपणे चालू लागली.याच कंटकांनी आम्हाला घर सोडायला लावले.एवढेच नाही आम्हाला जीवे मारण्याचा प्रयोगही केला.
आमच्या सहवासात येणाऱ्या दगडधोंड्यांची फुले झाली.आम्हाला मारायला पाठवलेला रोढे माझाच अंगरक्षक झाला.धोंडीराम सत्यधर्मरक्षक झाला.रस्त्यावर उघड्यावर पडलेल्याना आधार देणे,नवजीवन देणे,रंजल्या गाजल्यांचा देव होणे हाच खरा धर्म आम्ही पाळला. आणि तुम्हालाही सांगितला. आम्हाला मुल नसताना अनाथालये उघडून यशवंत सोबत अनेक मुलाचे पालक झालोत.
मी महान म्हणल्याने कोणी महान होत नाही.कृतीतून मी महात्मा झालो.बहुजन मायबापानी स्वयंस्फूर्तितून मला महात्मा पदवी दिली.माझ्या अनेक ग्रंथातून शेतकऱ्यांचे दुःख मांडले,गुलामगिरी, ब्राम्हणांचे कसब शेतकऱ्यांचे आसूड यातून अस्पृश्यावर, शेतकऱ्यावर, दिन दलितांवर, बहुजनांवर होण्याऱ्या अन्यायावर कडाडून प्रहार केला.पोवाडे रचले,अखंड साधना केली.तुम्हाला खऱ्या धर्माची ओळख दिली.उजव्या हाताला अर्धांगवायू झाला असतानाही मृत्यूसमयी डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ लिहिला.
पण आज जे मी पाहतो मन अस्वस्थ होतंय.जो तो आपल्या परीने आचरण करू लागला.अजूनही विषमता संपली नाही.जातीभेद,धर्मभेद ,स्त्रीवरील अत्याचार,शेतकरी कामगार वर्गाची पिळवणूक देशात सुरूच आहे. हे बदलायला हवं तरुण वर्ग समोर येऊन लढायला हवं .हे सारं संपेल तेव्हा ती तुच्याकडून सर्वात मोठी आदरांजली ठरेल.
जगात देव एकच आहे.तो म्हणचे विश्वनिर्माता,निर्मिक.धर्म एकच आहे तो सत्यधर्म.त्या ईश्वराची आपण सारी लेकरं आहोत.सारे बांधव आहोत.स्त्री पुरुष सारे समान आहेत.साऱ्यांना आपल्या सदसद्विवेकबुद्धीने वागण्याचे स्वातंत्र्य आहे.म्हणून समता, बंधुता,स्वातंत्र्य हे तत्व अंगिकारा.सदैव हे तत्व आचरणात आणा.
सत्यमेव जयते!
""""""मारोती आरेवार गडचिरोली
9403239435