व्यथांचा कळवळा होता
सुखांचाही लळा होता
तुझ्या पहिल्याच भेटीचा
अनोखा सोहळा होता
पुरावे दावले ज्याला
बिचारा आंधळा होता
उन्हातान्हात खपला अन
फुलवला तो मळा होता
गुणावर भाळली होती
जरी तो सावळा होता
कधी ना वाकला बाबा
जगाच्या वेगळा होता
जिवाला जीव देणारा
शिवाचा मावळा होता
,,,,,मारोती आरेवार गडचिरोली
No comments:
Post a Comment