Sunday, January 19, 2020

युवकांनो दारूपासून दूर रहा

युवकांनो दारूपासून दूर रहा
_________________________

         काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने कायदा करून गडचिरोली, चंद्रपूर ,वर्धा जिल्ह्यात दारूबंदी केली.काही दिवस सरकारने कडक धोरण अवलंबून दारू विकणाऱ्या व पिणाऱ्यांना पकडून कारवाई केल्याच्या बातम्या रोजच्या रोज येत होत्या.तरीही कायदा पायदळी तुडवणाऱ्यांची दांडगाई काही कमी झाली नाही.शेजारच्या राज्यातून ,दुसऱ्या जिल्ह्यातून येणारी दारू काही कमी करता आली नाही.पूर्वीसारखाच गल्लीबोळात दारूचा महापूर वाहू लागला.आता सरकार बदलल्यानंतर दारूबंदी हटणार अश्या बातम्या येऊ लागल्यात.काहींचा याला विरोध तर काहींचा या निर्णयाला पाठिंबा पण आहे
पण दारू पिणे वाईट आहे हे तुम्हाला आम्हाला साऱ्यांना माहीत आहे ,पैश्याची व्यर्थ उधळण होते.घरातील एक सदस्य जरी दारूच्या आहारी गेला असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो.मुलाबाळावर त्याचे वाईट परिणाम होतात.भांडणे होतात.घरात सुखशांती नांदत नाही.
       हे सर्व आम्हा तरुण वर्गाला माहीत आहे.सरकार कायदा करेल ,तेव्हा दारूबंदी होईल किंवा दारूबंदी हटवेल, दारू स्वस्तात मिळेल लोकांचा पैसा वाचेल या सर्व आपल्या कल्पनाना तेवढा अर्थ नाही.दारू हे व्यसन आहे माणसाला जेवढे स्वस्तात मिळेल तेवढाच तो जास्त आहारी जाईल.त्यामुळे तेवढंच त्याचे शरीर खंगत जाईल दवाखाण्याचा खर्च वाढेल कुटुंबाला त्याचा काही फायदा होणार नाही .
      त्यापेक्षा आपण सरकारवर अवलंबून न राहता गावागावात तरुणवर्ग पुढे येऊन स्वतः दारूपासून दूर राहून आपल्याच कुटुंबात,समाजात ,गावा याविषयी जनजागृती केली,                 आपणच आपले सरकार होऊन यावर ठोस उपाययोजना केलं तर माझ्या मते हे शक्य आहे.
         मध्यंतरी काही गावात महिला वर्ग समोर येऊन गाव व्यसनमुक्त झालेलं आहे आता तरुणवर्ग समोर येऊन यावर उपाय शोधणे आवश्यक आहे .केवळ सरकारवर अवलंबून न राहता युवकवर्ग यात महत्वाची भूमिका बजावणे आवश्यक आहे तरच हे शक्य आहे.
नाहीतर दारू बंद असो की ती चालू दारूचा महापूर वाहतच राहणार.

    """"" मारोती आरेवार

No comments:

Post a Comment