दाह.....
वखवखलेली नजर यांची
तुझ्यावरती टपून आहे
जपून टाक पाऊल आता
डाव वेगळा रचून आहे
का अजुनी खेळणी समजून
वापर होतो आहे तुझा
माणुसकीचा अंत येथे
तू चार भिंतीत दडून आहे
पंखांना उभारी देऊन
उडू पाहशी कित्येकदा पण
बहुतेक उडणे तुझे हे
डोळ्यात यांच्या खुपुन आहेI
झाले कायदे कित्येक तरी
बदलली नाही मानसिकता
न्याय मागता मागता निवाडा
पुराव्याअभावी अडून आहे
आई होणे पाप झाले का
का बाप भोगतो अशी सजा
समजेल केव्हा जगास या
सडके विचार भरून आहे
,,,,,,मारोती आरेवार